Fri, Feb 3, 2023

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या नावाने पैशाची मागणी
Published on : 9 December 2022, 3:10 pm
पिंपरी : धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून एकाकडे फोनवरून पैशांची मागणी केली. तसेच शिवीगाळ करीत धमकी दिली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चिखली येथील एका व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार हे एका सुरक्षा एजन्सीत काम करतात. दरम्यान, शुक्रवारी ते घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञाताने फोन आला. 'मी धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत आहे' असे सांगत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. तसेच, शिवाजीनगर येथील डीएमच्या कार्यालयात पैसे आणून दे, असे म्हणत आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.