esakal | पिंपरी-चिंचवडला डेंग्यूसह मलेरियाची भिती
sakal

बोलून बातमी शोधा

Increases in dengue patients

पिंपरी-चिंचवडला डेंग्यूसह मलेरियाची भिती

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेतून आता कुठे सावरत असलेल्या शहरावर आता डेंग्यूसह (dengue) मलेरियाचे (maleria) नवे संकट ओढवले आहे. सध्या शहरात मलेरियाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. सातत्याने बदलणारे वातावरण आणि पाऊस हे रोगांच्या प्रसारासाठी पोषक ठरत आहे. परिणामी, मलेरियाच्या १२ हजार ३६ रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. थोड्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होत असल्याने मलेरियाचे प्रमाणही जास्त दिसू लागल्याची सूचना फॅमिली डॉक्टर देत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सध्या तापामुळे व त्यासोबत येत असलेल्या सर्दी-खोकल्याने अनेकजण हैराण आहेत. जून-जुलैच्या तुलनेत सध्या तापाच्या रुग्णांमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. व्हायरल ताप तीन दिवसांत कमी होतो. त्यामुळे त्याला घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. तापासोबत उलट्या, जुलाब होत असतील, खूप जास्त ताप येत असेल तर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. लहान मुले, वृद्ध यांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना या आजारांचा अधिक त्रास होतो. त्यामुळे त्यांच्याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे १२५७ तर डेंग्यूचे १५२ रुग्ण सापडले आहेत. यंदा शहरात जानेवारी ते ऑगस्टदरम्यान मलेरियाच्या १२०३६ रुग्णांची नोंद करण्यात आली. संशयित मलेरिया रुग्णांची तपासणी केली असता, अशा रुग्णांची संख्या २ पर्यंत पोहोचली आहे. याशिवाय, गेल्या आठ महिन्यांत चिकन गुनियाच्या फक्त ३२ रुग्णांची नोंद झाली. शहरात मागील आठ महिन्यांतील सर्वात कमी संसर्गाच्या दराची नोंद एप्रिल आणि मे या महिन्यात झाली.

हेही वाचा: कोरोना मृतांच्या वारसांना मदत कधी देणार? SC ने केंद्राला फटकारले

त्यानंतर सलग जून ते ऑगस्ट महिन्यात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. ज्या भागात मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून संबंधित भागात तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या नव्या स्ट्रेन 'सी.1.2' वर मंथन सुरू; सतर्क राहण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

आठ महिन्यातील मलेरिया रुग्णसंख्या

  • जानेवारी : १८३६

  • फेब्रुवारी : १७००

  • मार्च : १८३०

  • एप्रिल : ९९६

  • मे : ९६२

  • जून : ११९४

  • जुलै : २२६१

  • ऑगस्ट : १२५७

loading image
go to top