शिष्यवृत्तीचे अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करा; माजी खासदार बाबर यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना झालेला नाही.

पिंपरी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना झालेला नाही. परिणामी विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून, त्यांचे पुढील शिक्षण थांबू नये. यासाठी शिष्यवृत्ती अनुदान प्रत्येकाच्या खात्यावर वर्ग करावे, अशी मागणी कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेच्या वतीने अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात बाबर यांनी म्हटले आहे, की 2019-20 या शैक्षणिक वर्षातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षामध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना यांचा लाभ मिळतो. परंतु, यावर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनुदान प्राप्त झाले नसल्याने ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. त्यांचे पुढील शिक्षण थांबू नये, यासाठी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने सहकार्य करून सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत अनुदान त्वरित जमा करावेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या निवेदनावर उपाध्यक्ष मिलिंद यादव-सोळसकर, सचिव गणेश बाबर, खजिनदार विठ्ठल रांजणे, सदस्य जयवंत पवार, संजय जाधव, लक्ष्मण निंबाळकर, ऋतुराज फडतरे, प्रमेय आर्यमाने, ऋषिकेश मस्के आदींच्या सह्या आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deposit scholarship grant to student account demands former mp gajanan babar