esakal | नैराश्यातून बाहेर पडा; चिंता सोडा
sakal

बोलून बातमी शोधा

depression

नैराश्यातून बाहेर पडा; चिंता सोडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘गेल्या दीड वर्षात आपण स्वकीयांचे मृत्यू, लॉकडाउन, बेरोजगारी अशा नैराश्याच्या वातावरणात जगत आहोत. यातून असुरक्षा आणि चिंतेची भावना वाढलेली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मनापासून प्रयत्न होणे गरजेचे आहे. ठामपणाने सामोरे जाणे हेच एक उत्तर आहे,’’ असे मत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या सहयोगी प्राध्यापक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्मिता पानसे यांनी व्यक्त केले. (Pune News)

कोरोनामुळे विधवा झालेल्यांसाठी महापालिकेतर्फे संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित ‘उमेद जागर’ उपक्रमाच्या तृतीय सत्रात डॉ. पानसे यांनी समुपदेशन केले. नगरसेविका माधुरी राजापुरे, सुजाता पालांडे, नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: जबरदस्त! पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजराचा सेन्सेक्स ५८ हजारच्या पुढे

डॉ. पानसे म्हणाल्या, ‘‘उमेद जागर उपक्रमातून विधवांना उभारी देण्याबरोबरच आत्मनिर्भर करण्याचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल महापालिकेने उचलले आहे. मानसिकदृष्ट्या सावरण्याचे काम यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ करणार आहेत. वेळीच आपण दुःखातून स्वतःला सावरले नाही, तर पुढे खूप त्रास होतो. यासाठी एखादी उमेद जागृत ठेवणे आवश्यक असते. ती असल्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. कोणतेही दुःख एका ठराविक मर्यादेपर्यंत सांभाळून नंतर त्यातून सावरणे अपेक्षित असते. अन्यथा त्यातून नैराश्‍यात जायला वेळ लागत नाही. राग, द्वेष वाढीला लागतात.’’ सुहास बहाद्दरपुरे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा: गणेशोत्सव, ईद, दिवाळीसाठी केंद्राची मार्गदर्शक सूचना

विविध कार्सेसची माहिती

महापालिकेच्या उमेद जागर उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात पुणे कनेक्ट लाईट हाऊस या स्वयंसेवी संस्थेच्या सोनाली कांबळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. लाइट हाउस उपक्रमातून राबविल्या जाणाऱ्या विविध कोर्सेसची माहिती दिली. उपायुक्त चारठाणकर यांनी नागरवस्ती विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची व योजनांची माहिती दिली.

loading image
go to top