VIDEO : मावळातील नुकसानीची अजित पवार यांच्याकडून पाहणी; भरपाईबाबत म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मावळ तालुक्यातील पवळेवाडीत आले होते.

कामशेत/टाकवे बुद्रुक : केंद्र सरकारने पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यात झालेल्या वादळाच्या वेळी त्या राज्यांना मदत केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली असून केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मावळ तालुक्यातील पवळेवाडीत आले होते. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवार बोलत होते. मावळचे आमदार सुनिल शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम , प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसुदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबूराव वायकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी पवळेवाडीतील सावित्रीबाई गुणाजी जोगेश्वर यांच्या पॉलिहाऊसची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी पवार यांना निवेदन दिले. पवार यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवार म्हणाले, की निसर्ग चक्रीवादळाने पुणे व रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तातडीने सुरू आहे. उद्या शनिवारी (ता. 6 ) सकाळी 10 वाजता मंत्रालयात मावळचे आमदार सुनील शेळके, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले. कोलमडून गेलेली वीज पुरवठा यंत्रणा तातडीने सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या पवारांनी फुल उत्पादक शेतकऱ्यांची अस्थेने चौकशी केली. वादळाने फुलशेतीचे नुकसान झालेच आहे, परंतु यापूर्वी कोरोनाच्या संकटातही फुलांचे मोठे नुकसान झाले असल्याचे फुल उत्पादक शेतकऱ्यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar inspects the damage in Maval