अजित पवारांकडून पिंपरी-चिंचवडमधील 'जम्बो फॅसिलिटी'ची पाहणी, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

- जम्बो फॅसिलिटी रुग्णालयांच्या कामाची पाहणी 

पिंपरी : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. योग्य नियोजन करून मुंबईतील रुग्णवाढीवर नियंत्रण मिळविले आहे. आता पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातही युद्ध पातळीवर काम सुरू आहे. सरकारच्या या कामात इतर सामाजिक संस्थांनी देखील पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

पिंपरीतील महापालिका रुग्णालय फुल्ल; कोरोना रुग्णांना मिळेना व्हेंटिलेटर बेड

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेतर्फे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम, चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्‍लस्टर सभागृह व पिंपरीतील बालनगरी येथे 'जम्बो फॅसिलिटी' रुग्णालय उभारण्यात येत आहे. मगर स्टेडियम येथील कामाची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. ते म्हणाले, "पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वीस हजारांपेक्षा जास्त असला, तरी साडेसतरा हजारांहून जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आगामी काळात आणखी रुग्ण संख्या वाढण्याचा धोका विचारात घेऊन आण्णासाहेब नगर स्टेडियम, ऑटो क्‍लस्टर व बालनगरी येथे जम्बो फॅसिलिटी रुग्णालय उभारण्यात येत आहेत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार व महापालिका काम करीत आहे. वायसीएम रुग्णालय कोविडसाठी समर्पित केले आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, राजमुद्रा ग्रुप व राजू मिसाळ मित्र परिवाराने वायसीएम रुग्णालयासाठी 45 ऑक्‍सिजन सिलिंडर पवार यांच्या हस्ते भेट दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. तसेच, अत्यावश्‍यक सेवेसाठी दुर्गादेवी टेकडी येथे ट्रॉली स्ट्रेचर व फोल्डींग स्ट्रेचर भेट दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deputy cm ajit pawar inspects work of jumbo facility hospital in pimpri chinchwad