esakal | मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; डेप्युटी कमिशनरसह एकाचा मृत्यु
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; डेप्युटी कमिशनरसह एकाचा मृत्यु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कामशेत - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Way) कामशेत बोगदा येथे ट्रकला (Truck) मोटारीची (Motor) धडक बसल्याने दोन जणांचा मृत्यु (Death) झाला. या दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात डेप्युटी कमिशननरचा मृत्यू झाला. (Deputy Commissioner Death in Truck and Motor Accident)

अपघात अभिजित रामलिंग घवले (वय. ४५, डेप्युटी कमिशनर जीएसटी, माजगाव, मुंबई), शंकर गौडा यतनाल (वय ४५), यांचा अपघातात मृत्यू झाला असून अभिजित घवले यांची पत्नी शिल्पा अभिजित घवले (वय ४०) व चालक पंडित खंडू पवार (वय ३७) हे गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा: हिंजवडीतील 18 हॉटेल, हुक्काबार, रेस्टॉरंट सील

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मंगळवार (ता. २५) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे लेनवर कामशेत बोगद्याजवळ (किलोमीटर नं. ७२) येथे समोर चाललेल्या ट्रकला मागून येणाऱ्या चारचाकीची जोरदार धडक बसून भीषण अपघात घडला. जखमींवर सोमाटणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग युनिटचे सतीश वाळुंजकर, सचिन जाधव, संजय राक्षे, संतोष वाळुंजकर यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच प्रमाणे घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.