माफी न मागण्यावर उपमहापौर ठाम 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 December 2020

घोळवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली. मात्र, घोळवे यांनी माफी मागण्यास नकार दिला असून, मी शेतकऱ्यांचा आदरच केला आहे, अशी भूमिका घेतली. 

पिंपरी - दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांबद्दल उपमहापौर केशव घोळवे यांनी गेल्या आठवड्यातील सर्वसाधारण सभेत वादग्रस्त विधान केले. त्याचा विविध संघटनांनी निषेध केला आहे. घोळवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली. मात्र, घोळवे यांनी माफी मागण्यास नकार दिला असून, मी शेतकऱ्यांचा आदरच केला आहे, अशी भूमिका घेतली. 

थर्टी फर्स्टसाठी पर्यटकांची लोणावळ्याला पसंती

शेतकऱ्यांची माफी मागा - भापकर 
केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात अध्यादेशाद्वारे तीन कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्यामुळे शेतकरी व शेती व्यवस्थेवर खूप विपरित परिणाम होणार आहे. त्याची झळ शेतकऱ्यांसह शेतमजूर, कष्टकऱ्यांनाही बसणार आहे. त्यामुळे दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यातील काहींचा बळी गेला आहे. मात्र, आपण शेतकऱ्यांबाबत अपशब्द वापरला आहे. त्याचा निषेध आहे. आपण कामगार चळवळीतील आमचे सहकारी असतानाही असे वक्तव्य कसे करू शकता? असे पत्र भापकर यांनी घोळवे यांना पाठविले आहे. आपल्या भूमिकेची आम्हाला लाज वाटते. आपले वक्तव्य त्वरीत मागे घेऊन शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी व सभागृहाच्या कामकाजातून आपले वक्तव्य काढून टाकावे, असे आवानही त्यांनी केले आहे. 

प्राणी अंत्यविधीसाठी एक हजार रुपये शुल्क; "स्थायी'चा निर्णय

शेतकऱ्यांबाबत आदर - घोळवे 
शेतकरी व कामगार यांचा अवमान होईल, असे कोणतेही व्यक्तव्य माझ्याकडून झालेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांच्या कल्याणासाठी आयोगाने सांगितलेल्या शिफारशींची त्वरीत अंमलबजावणी करावी यासाठी मी स्वत: प्रयत्न केले आहेत. मी कामगार कार्यकर्ता असल्याने सोशित, वंचित, पीडित कामगारांसाठी समर्पित भावनेने काम करत आलो आहे. कामगारांसाठी चांगले कल्याणकारी कामगार कायदे व्हावेत, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. तसेच, बोनस कायद्यातील वाढ, महिला कामगारांसाठी मॅटर्निटी रजेच्या कालावधीतील वाढ, किमान वेतनातील वाढ अशा विविध चांगल्या घटकांचा उल्लेख त्यात आहे. मी उसतोड कामगार, शेतकऱ्याचा मुलगा असून, कष्टकरी, कामगार, शेतकरी घटकांचा माझ्या हृदयात नितांत आदर आहे व कायम राहील, असे उत्तर घोळवे यांनी भापकर यांना दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Mayor Keshav Gholave refused to apologize and took a stand saying that he respected the farmers