
जमीन खरेदी व्यवहाराची नोंदणी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधकासह खासगी इसमास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. निबंधक रवींद्र जनार्दन भोसले (वय-५०, रा. कॅम्प, पुणे) व खाजगी इसम रमेश आंद्रे (वय-३८, रा. नाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
लोणावळा - जमीन खरेदी व्यवहाराची नोंदणी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधकासह खासगी इसमास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. निबंधक रवींद्र जनार्दन भोसले (वय-५०, रा. कॅम्प, पुणे) व खाजगी इसम रमेश आंद्रे (वय-३८, रा. नाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बुधवारी (ता.२५) रात्री उशिरापर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू होती. तक्रारदाराची वाकसई देवघर ग्रामपंचायत हद्दीमधील जागेचे खरेदी खत नोंदविण्यास लोणावळा उपनिबंधक टाळाटाळ करत होते. सदर खरेदी खत नोंदणीसाठी मध्यस्थामार्फत ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
निगडीत सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार; पायला गोळी लागल्याने एक जण जखमी
तक्रारदाराने (वय - ६०, रा. मुंबई) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. बुधवारी सायंकाळी दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा लावत तडजोडअंती ठरलेली २५ हजार रुपयांची लाच खासगी इसम रमेश आंद्रे यांच्यामार्फत स्विकारताना निबंधक रवींद्र भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस हवालदार मुश्ताक खान, पोलीस शिपाई किरण चिमटे, पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Edited By - Prashant Patil