निगडीत सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार; पायला गोळी लागल्याने एक जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

दोडमने व खवले यांच्यात अनेक दिवसांपासून  वाद आहे. दरम्यान, बुधवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. यामध्ये खवले याने आपल्याजवळील पिस्तुलातून दोडमने याच्यावर गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी दोडमाने याच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर खवले घटनास्थळावरून पसार झाला.

पिंपरी  : सराईत गुन्हेगाराने केलेल्या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी(ता.26) रात्री साडेअकराच्या सुमारास निगडीतील ओटास्कीम येथे घडली. आकाश दोडमने (रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, अंकुश चौक, ओटास्कीम, निगडी) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. तर किरण खवले असे  गोळीबार केलेल्याचे नाव आहे.

'...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!​

दोडमने व खवले यांच्यात अनेक दिवसांपासून  वाद आहे. दरम्यान, बुधवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. यामध्ये खवले याने आपल्याजवळील पिस्तुलातून दोडमने याच्यावर गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी दोडमाने याच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर खवले घटनास्थळावरून पसार झाला.

Corona Updates: ३५ दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा रुग्णांचा आकडा हजारापार!

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत.

दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन​

(Edited By : Sharayu Kakade)
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One person was shot in the leg and injured by criminals in nigdi