दिघी गॅस सिलिंडर स्फोटप्रकरणी मृत महिलेवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

दिघी येथे वीस दिवसांपूर्वी घडलेल्या गॅस सिलिंडर स्फोटप्रकरणी मृत महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : दिघी येथे वीस दिवसांपूर्वी घडलेल्या गॅस सिलिंडर स्फोटप्रकरणी मृत महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू तर पाचजण जखमी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अर्चना महेंद्र सुरवडे (वय 35, रा. अष्टविनायक अपार्टमेंट, दिघी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. 9 ऑगस्टला सकाळी सहा वाजता अर्चना यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत अर्चना गंभीररित्या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच या स्फोटामुळे घराची भिंत कोसळून त्यांचे घराशेजारील ज्ञानेश्वर मधुकर टेमकर (वय 35) यांचाही मृत्यू झाला. यासह अर्चना यांची मुलगी दीक्षा, मुलगा अमित, पती महेंद्र यासह श्रावणी विजय पाचपुते, अनुष्का ज्ञानेश्वर टेमकर हे जखमी झाले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्चना यांनी घटनेच्या आदल्या रात्री त्यांच्या घरातील किचनमधील गॅस शेगडीचे बटन सुरु ठेवल्याने सर्वत्र गॅस पसरला. त्यानंतर 9 ऑगस्ट सकाळी लाईटचे बटन सुरु केले असता स्फोट झाल्याचे तपासादरम्यान समोर आले. गॅस एजन्सीकडून आलेला अहवाल व साक्षीदारांचे जबाब घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dighi gas cylinder blast case, dead woman charged