वीस लाख मागत त्याने पोटाला पिस्तूल लावले अन्...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

फिर्यादीने पैसे न दिल्याचा राग आरोपीच्या मनात होता. 

पिंपरी : 'दोन दिवसांत वीस लाख रुपये दे, नाहीतर गोळ्या घालेन', अशी धमकी दिल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दिघी येथे घडली. 

बापू परांडे (रा. दिघी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी उमेश विठ्ठल वाळके (वय 45, रा. दिघी गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी एकाच भागात राहायला असून, आरोपी हा फिर्यादीकडे अनेक दिवसांपासून हातउसणे पैसे मागत होता. परंतु, फिर्यादीने पैसे न दिल्याने याचा राग आरोपीच्या मनात होता. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, शुक्रवारी (ता. 31) रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी हे दत्तगड डोंगराच्या पायथ्याजवळील रस्त्याने त्यांच्या मित्रासह घरी जात असताना आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याच्याकडील पिस्तूल फिर्यादीच्या पोटाला लावले. 'दोन दिवसांत वीस लाख रुपये दे, नाहीतर तुला गोळ्या घालणार', अशी धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dighi police arrest man for threatening to kill for money

टॅग्स
टॉपिकस