esakal | पिंपरी-चिंचवड : लाच घेताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला पकडले 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड : लाच घेताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला पकडले 

दिघी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला चार हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले.

पिंपरी-चिंचवड : लाच घेताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला पकडले 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : दिघी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला चार हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. ही कारवाई गुरुवारी (ता. 15) रात्री करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

निवृत्ती सदाशिव चव्हाण (वय 56) असे ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चव्हाण हे दिघी पोलिस ठाण्यात सहायक उपनिरीक्षपदी कार्यरत आहेत. तसेच, तक्रारदार यांच्यावर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चव्हाण यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती चार हजार घेण्याचे ठरले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, तक्रारदार यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारी चव्हाण यांना चार हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर, सुनील बिले, पोलिस नाईक वैभव गोसावी, शिपाई गणेश भापकर, प्रशांत वाळके यांच्या पथकाने केली.