Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 121 जणांना डिस्चार्ज 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 161 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 87 हजार 594 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 161 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 87 हजार 594 झाली आहे. आज 121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 84 हजार 246 झाली आहे. सध्या एक हजार 821 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक आणि बाहेरील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 527 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 630 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष कासारवाडी (वय 78) आणि शहराबाहेरील पुरुष नागरिक धानोरी (वय 40), आंबेगाव (वय 57), पेरणे फाटा (वय 55) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात सध्या बाहेरील 194 रुग्ण उपचार घेत आहेत. आज शहराबाहेरील 12 जण पॉझिटिव्ह आढळले. सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 947 रुग्ण उपचार घेत आहेत. 874 रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत शहरातील सहा हजार 406 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील 371 रुग्ण सध्या शहराबाहेरील रूग्णालयात दाखल आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज दोन हजार 206 संशयित रुग्ण तपासण्यात आले. त्यातील एक हजार 707 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एक हजार 138 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. आज कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 926 घरांतील सात हजार 619 नागरिकांची तपासणी करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: discharge of 121 corona positive persons in pimpri chinchwad city