आंद्रा धरणातून ५१६ क्युसेकने विसर्ग सुरू; नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

अवकाळी पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कता बाळगावी असे आवाहन शाखा अभियंता हांडे यांनी केले. दिवसभरात धरण परिसरात ६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे.

कामशेत(पिंपरी) : आंद्रा धरण परिसरात दोन दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळल्याने गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास धरणातून ५१६ क्युसेकने विसर्ग सुरू झाल्याची माहिती शाखा अभियंता अनंता हांडे आणि उमेश यादव यांनी दिली.

‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

अवकाळी पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कता बाळगावी असे आवाहन शाखा अभियंता हांडे यांनी केले. दिवसभरात धरण परिसरात ६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे.

 पुण्यातील 68 वर्षीय आजोबांना नडला डेटिंगचा मोह!

मागील वर्षी धरण परिसरात २२५७ मिलीमीटर पावसाचा नोंद झाली होती. मात्र सांडव्यावरून विसर्ग नव्हता. यंदा ११२१ मिलीमीटर पाऊस पडला आहे, पाण्याची पातळी ६१४ मिलीमीटर असून एकूण साठा ८३.३०. दशलक्षघनमीटर आहे. त्यापैकी उपयुक्त साठा ८२.७५ दशलक्षघनमीटर आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discharge from Andhra Dam starts at 516 cusecs