पिंपरी : भाडेतत्त्वावरील पीएमपी बसच्या दरात मिळणार एवढी सूट

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

  • पीएमपी भाडेतत्वावरच्या बस दरामध्ये सवलत
  • 50 ते 60 रूपये प्रति किलोमीटर दराने बस मिळणार

पिंपरी : लॉकडाउनपासून झालेल्या सर्वाधिक नीचांकी उत्पन्नामुळे पीएमपीवर आर्थिक संकट कोसळले आहे. पीएमपीची ही तूट भरून काढण्यासाठी चाकण, हिंजवडी, भोसरीसह चिंचवड एमआयडीसी कंपन्या, शासकीय व खासगी संस्था व आयटी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी मासिक करारावर चालविण्यासाठी दिलेल्या भाडेतत्त्वावरील बसमध्ये पीएमपीच्यावतीने वीस टक्के सवलत देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी व पुणे महापालिकेकडे कर्मचारी हस्तातंरण करून कंपन्यांना बसेस पुरविण्याबाबत संचालक मंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. पीएमपीने यापूर्वी दिलेल्या पत्राद्वारे प्रतिमाह एका व्यक्तीपाठीमागे किमान 2 हजार किलोमीटर आणि प्रति किलोमीटर 83.50 पैसे दर ठरविण्यात आले होते. परंतु, हा दर जास्त असल्याचे हिंजवडी असोसिएशन व इतर कंपन्यांनी कळविले होते. मागील तीन महिन्यात 150 कोटी रुपये उत्पन्नावर पाणी फिरले आहे. संचलनाविना हजारो बस जागेवर उभा आहेत. त्यामुळे सीपीके (cost per km) ऐवजी ईपीके (earning per km) नुसार बसेस भाड्याने देण्याबाबत पुन्हा एकदा संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आहेत सवलती

चालक-वाहकांसह प्रतिकिमी जवळपास 50 ते 60 रुपये प्रमाणे बसेस भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल डिस्टन्स व मास्कविना या बसेस धावणार नाहीत. त्यानुसार ठरलेल्या वेळेनुसार जवळील पीएमपी डेपोतून कंपन्यांना त्यांच्या सोईनुसार बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याबाबतीत सविस्तर माहितीसाठी पीएमपीच्या 020-24503300 , 9881495582 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discount on fares on PMP bus