- बेलाजी पात्रे
हिंजवडी - हिंजवडी-माण रस्त्यावरील रुंदीकरणाच्या कार्यवाहीनंतर राडारोडा उचलण्यासाठी पोलीस बंदोबस्तात दाखल झालेल्या पीएमआरडीए पथकाला स्थानिक जागा मालकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. जागा मालकांनी 'आधी मोबदला द्या, जागा मोजून द्या, मगच ताबा घ्या' अशी मागणी करत राडारोडा हटवण्यास विरोध दर्शवत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.