

RTE Admission
esakal
पिंपरी - शिक्षण हक्क कायदा अर्थात ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत प्रशासनाने यंदा बदल केले आहेत. यात २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी शाळेच्या तीन व पाच किलोमीटर अंतराची अट कमी करण्यात आली आहे. तर, आता केवळ एक किलोमीटर अंतराच्या आतील शाळेत विद्यार्थी ‘आरटीई’ प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. परिणामी, नामांकित शाळांमध्ये प्रवेशापासून गरजू विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.