Video : पुणे, पिंपरीतील गरजू नागरिकांसह जनावरांना अशी करताहेत मदत...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

- पुजाऱ्यांना महिन्याभराचे धान्य वाटप, तर जनावरांना दिला चारा 

पिंपरी : इस्कॉन-अन्नामृत फाउंडेशनच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध मंदिरांचे पुजारी, पूजा-अर्चा करणारे गुरुजी यांना महिन्याभराच्या धान्याची मदत करण्यात आली. तसेच पिंपरी-चिंचवडमधील भटक्‍या जनावरांसाठी 15 टन चाऱ्याची व्यवस्थाही संस्थेकडून करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मासुळकर कॉलनी येथील बजाज ग्रुप, इस्कॉन-अन्नामृत फाउंडेशनतर्फे महापालिकेच्या प्राथमिक-माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना वर्षभर एवढा पोषक आहार पुरविला जातो. मात्र, मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र टाळेबंदी लागू असल्याने इस्कॉन-अन्नामृत फाउंडेशनने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील गोरगरीब, गरजू लोकांना जेवण पुरविले जात आहे. त्याचबरोबरीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मंदिरांचे पुजारी आणि पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींनाही संस्थेने मदतीचा हात दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संस्थेचे व्यवस्थापक सीतापती दास म्हणाले, "आमच्या संस्थेचे संचालक संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन महिन्यांपासून सलग आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गरजू लोकांना जेवण वाटप करत आहोत. पिंपरी- चिंचवडमध्ये रोज 40 हजार, तर पुण्यात दररोज 25 हजार लोकांना अन्न पुरविले जात आहे. पुण्यातील लोकांसाठी स्वारगेट आणि कात्रज येथे खास किचन सुरू करण्यात आले. दिवसातील 14 तास आमचे किचन सुरू असते. 31 मेपर्यंत आम्ही जेवण वाटप चालू ठेवण्याचा आमचा विचार आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने आम्ही ते कमी करत आहोत. पुण्यात सध्या दिवसाला 20 हजार, तर पिंपरी-चिंचवडमध्ये रोज 5 हजार लोकांना जेवण दिले जात आहे.''

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सहकार्याने पुजारी-गुरुजी यांना शिधावाटप करण्यात आले. त्यामध्ये गहू, तांदूळ प्रत्येकी 5 किलो, नाचणी पीठ 2 किलो, मुगडाळ, तेल, शेंगदाणे, साखर प्रत्येकी एकेक किलो यांचा समावेश होता. या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील भटक्‍या जनावरांना 15 टन चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of foodgrains to the needy by ISKCON, Annamrut Foundation