वडगावात भाजप व्यापारी, महिला आघाडीने राबविला हा स्तुत्य उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 July 2020

वडगाव शहरामध्ये सातत्याने दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने पक्षाच्या वतीने सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती म्हाळसकर यांनी दिली.

वडगाव मावळ (पुणे) : शहरामध्ये होणाऱ्या दूषित आणि गढूळ पाण्यावर उपाययोजना म्हणून भारतीय जनता पक्ष व्यापारी व महिला आघाडीच्या वतीने चार हजार मेडिक्लोर एम बाटल्यांच्या वाटपाचा प्रारंभ पक्षाचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते करण्यात आला.

येथील ग्रामदैवत पोटोबा महाराज प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला पक्षाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, महिलाध्यक्षा सायली बोत्रे, गुलाबराव म्हाळसकर, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, शहराध्यक्ष किरण भिलारे, प्रसाद पिंगळे, रविंद्र म्हाळसकर, बाळासाहेब  म्हाळसकर, नगरसेवक दिनेश ढोरे, प्रविण चव्हाण, अॅड. विजय जाधव, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, शामराव ढोरे, अर्चना म्हाळसकर, सुनिता भिलारे, अनंता कुडे, विकी म्हाळसकर आदी उपस्थित होते. वडगाव शहरामध्ये सातत्याने दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने पक्षाच्या वतीने सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती म्हाळसकर यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुख्याधिकारी ओगले यांनी सांगितले, की तातडीने उपाययोजना आखून लवकरात लवकर शुद्ध पाणी पुरवठा होईल, यासाठी नगरपंचायत प्रयत्न करेल. व्यापारी आघाडी अध्यक्ष भूषण मुथा आणि महिला आघाडी अध्यक्ष धनश्री भोंडवे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला असून, शहरातील सर्व १७ प्रभागामध्ये घरोघरी या बाटल्यांचे वाटप केले जाणार आहे. धनश्री भोंडवे यांनी प्रास्ताविक केले. भूषण मुथा यांनी सूत्रसंचालन केले. युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: distribution of four thousand bottles of mediclor in vadgaon maval