Pimpri News : जिल्हा रुग्णालय कचऱ्याने ग्रस्त; दुर्गंधीमुळे रुग्ण-नातेवाइक त्रस्त; प्रशासन मात्र निष्क्रिय!

Public Health : नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि संसर्गाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. रुग्ण व नातेवाईक प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी करत आहेत.
Garbage Accumulation Raises Health Concerns

Garbage Accumulation Raises Health Concerns

Sakal

Updated on

पिंपरी : सर्वसामान्यांना दर्जेदार आणि स्वच्छ आरोग्य सेवा मिळावी, यासाठी हे ध्येय बाळगून शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालय परिसरात कचऱ्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दुर्गंधीचा त्रास असह्य झाला आहे. रुग्णालय परिसरात डुकरांचा वावर असतो. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी असे प्रकार होणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पुरावा असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. सध्या बदलत्या हवामानामुळे विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांची संख्या वाढत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com