fire crackers
fire crackersesakal

Noise Pollution : दिवाळीत ध्वनिप्रदूषण रोखू या! कमी आवाज आणि शोभेच्या फटाक्यांचा वापर हवा

‘फटाक्यांशिवाय दिवाळीचा आनंद घेता येत नाही’ किंवा ‘फटाक्यांशिवाय दिवाळी नाही,’ असे म्हटले जाते.

पिंपरी - ‘फटाक्यांशिवाय दिवाळीचा आनंद घेता येत नाही’ किंवा ‘फटाक्यांशिवाय दिवाळी नाही,’ असे म्हटले जाते. त्यामुळे दिवाळी म्हटलं की, घरांची रंगरंगोटी, रोषणाईने सजावट, चटपटीत फराळ, मिठाई, नवीन वस्तू आणि कपड्यांबरोबरच फटाक्यांची खरेदी ठरलेली असते. जो-तो आपापल्या पद्धतीने फटाक्यांची खरेदी करत असतो.

मात्र, आरोग्याचा विचार करता गेल्या तीन-चार वर्षांत कमी आवाजाची फटाके वाजविण्याकडे शहरातील नागरिकांचा कल दिसतो. कारण, पूर्वीपेक्षा गेल्या तीन वर्षांत दिवाळीच्या पाच-सहा दिवसांतच फटाक्यांची तीव्रता कमी झालेली दिसते.

असे असले तरी आवाजाची (ध्वनी)पातळी मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमन व नियंत्रणापेक्षा उच्चच राहिलेली आहे. ती कमी करण्यासाठी येत्या दिवाळीत आणखी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कमी आवाजाच्या किंवा शोभेच्या फटाक्यांचा वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य ठरेल.

fire crackers
Pune Utsavnama : ‘उत्सवनामा’च्या साडी महोत्सवाला जोडीनेच यायचं!

दिवाळी काळातील ध्वनिप्रदूषण

  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेतर्फे दिवाळी कालावधीत दरवर्षी विविध ठिकाणची ध्वनिप्रदूषण पातळी मोजली जाते

  • २०२१ व २०२२ मध्ये निवासी आणि शांतता क्षेत्रात निर्धारित ध्वनिपातळी ओलांडण्यात आली आहे

  • गेली तीन वर्षे दिवाळी कालावधीत डीलक्स चौक पिंपरी, चापेकर चौक चिंचवड व डांगे चौक थेरगाव येथे ध्वनिपातळी मोजली आहे

  • गेल्या वर्षी सर्वाधिक ध्वनिप्रदूषण चापेकर चौकात नमूद झाले आहे. सरासरी कमाल ७७.५७ व किमान ६०.१४ डिसिबल आहे

  • गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात अर्थात १८, २४ व २६ ऑक्टोबर रोजी पिंपरी, चिंचवड व थेरगाव येथे ध्वनिपातळी मोजली होती

fire crackers
Walchandnagar Crime : पराभूत उमेदवारकडून दशहतीसाठी हवेत गोळबार; पोलिसांनाही केला जीवे मारण्याचा प्रयत्न

दिवाळीत फटाके वाजवण्यापासून कोणाला रोखू शकत नाही. पण, आवाजाच्या फटाक्यांपेक्षा शोभेच्या फटाक्यांचा वापर करून दिवाळी सर्वांनीच साजरी करायला हवी. आवाजाच्या फटाक्याने ध्वनी व वायू प्रदूषण होते. शोभेच्या फटाक्यांनी वायू प्रदूषण होते, मात्र, ते कमी वापरल्यास प्रदूषण कमी होईल. ध्वनिप्रदूषण पूर्णतः रोखता येईल. आम्ही काही सोसायट्यांमध्ये हा प्रयोग केला होता. ध्वनी प्रदूषणाचा लहान मुलांना अधिक त्रास होतो, याचा विचार करून फटाके मर्यादित प्रमाणात आणि शोभेचे वापरावेत.

- अनिकेत प्रभू, पर्यावरणप्रेमी, थेरगाव

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणे, असे आपले धोरण आहे. इकोफ्रेंडली उत्पादने व वस्तूंचा वापर करून दिवाळीचा आनंद घ्यायला हवा. फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण रोखणे, आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वसुरक्षेची काळजीही प्रत्येकाने घ्यायला हवी. शिवाय, प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करून, स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही आणि समाजभान ठेवून प्रत्येकाने दिवाळी साजरी करायला हवी.

- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com