
Diwali Travel
Sakal
पिंपरी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी बसचे (ट्रॅव्हल्स) भाडेदर आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय सतर्क झाले आहे. त्याने ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानी भाडेवाढीला चाप बसणार असून, त्या दृष्टीने भरारी पथके नेमली जाणार आहेत. खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी एसटी दरपत्रकापेक्षा दीडपटीपेक्षा अधिक पैसे घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा ‘आरटीओ’ने दिला आहे.