esakal | पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करू नका; पिंपरी महापालिकेच्या बैठकीत पोलिस आयुक्तांचे आवाहन 
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करू नका; पिंपरी महापालिकेच्या बैठकीत पोलिस आयुक्तांचे आवाहन 
  • महापालिकेतर्फे आयोजित बैठकीत पोलिस आयुक्तांचे आवाहन 

पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करू नका; पिंपरी महापालिकेच्या बैठकीत पोलिस आयुक्तांचे आवाहन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "नियमांची अंमलबजावणी करताना पोलिसांच्या कामात कोणीही हस्तक्षेप करू नये,'' असे आवाहन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'महिला सुरक्षा'विषयी चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात महापालिकेतर्फे बैठक आयोजित केली होती. त्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत आलेल्या सुचनांना उत्तर देताना आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ आदी उपस्थित होते. कृष्ण प्रकाश म्हणाले, "महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वाटावे असे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध आहे. पोलिस दलातील 90 टक्के लोक प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात. 10 टक्के लोकांमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. नियमबाह्य काम करणाऱ्या पोलिसांवर नियमाधीन कारवाई करण्यात येईल. त्यांच्या भोवती असणारे दलाल आणि तडजोड करणाऱ्यांना दूर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांची संख्या कमी असल्याने नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.'' प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगरसेविकांच्या तक्रारी व सूचना 

अवैध धंदे, दारू, मटका, जुगार अड्डे गुन्हेगारीचे केंद्र असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उद्भवत आहे. काही उद्यानांत होणाऱ्या अश्‍लील प्रकार चालतात. त्यांना आळा घालावा. शाळा- महाविद्यालय परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण पाहता भरारी पथक नियुक्त करावे. रात्रीची गस्त वाढवावी. अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी उपाययोजना करून समुपदेशन करावे. गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसवावा. पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करावे. रहदारी अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. वाहतुकीचे सुरळीत नियोजन करावे. आवश्‍यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तक्रारदार महिलांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी. त्यांच्या तक्रारींची तत्काळ दाखल घ्यावी. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची पोलिांकडे नोंद असावी. पोलिस व नागरिकांमध्ये दलालांचा वाढता हस्तक्षेप रोखावा.