Pimpri Road Potholes : ‘तक्रारीनंतरच खड्डे दिसतात का?’ पावसामुळेच खड्डे पडत असल्याचा महापालिकेचा अजब दावा

पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही रस्त्याने जा, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. काही खड्डे खोल व मोठे आहेत. त्यात वाहने आदळून जीवघेणे अपघात होत आहेत.
service road akurdi to chinchwad station condition

service road akurdi to chinchwad station condition

sakal

Updated on

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही रस्त्याने जा, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. काही खड्डे खोल व मोठे आहेत. त्यात वाहने आदळून जीवघेणे अपघात होत आहेत. मात्र, पावसामुळे पुन्हा खड्डे पडत असल्याचे आणि पावसाळ्यात डांबरीकरण शक्य नसल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचे काम महापालिका अधिकारी करीत आहेत. केवळ प्राप्त तक्रारींनुसारच खड्ड्यांची डागडुजी केली जात आहे. नागरिकांना त्रास होत असतानाही प्रशासन तक्रारींची वाट पाहात आहे. त्यामुळे तक्रारींनंतरच खड्डे बुजवणार का, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com