कोरोनामुक्त होऊन रक्षाबंधन साजरी करू असं वाटतं होत, पण पुन्हा टेस्ट केली अन्...

कोरोनामुक्त होऊन रक्षाबंधन साजरी करू असं वाटतं होत, पण पुन्हा टेस्ट केली अन्...

पिंपरी : भावा-बहिणीचे अतूट नाते म्हणजे रक्षाबंधन. मात्र, यावर्षी अत्यावश्‍यक सेवा बजाविणाऱ्या प्रत्येकावरच कोरोनामुळे बंधने आली. अनेक बहीण-भावांच्या भेटीगाठी न झाल्याने डोळ्यांत अश्रू तरळले. वायसीएम हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या 28 वर्षीय महिला डॉक्‍टरलाही आपल्या दोन सख्ख्या भावांना भेटता आले नाही. काही दिवसांपूर्वी ड्युटीवर असताना अचानक त्रास जाणवू लागला. 20 जुलैला तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. 14 दिवसानंतर रक्षाबंधन साजरा होईल, ही आशा असतानाच पुन्हा स्वॅब घेतला अन् तोही पॉझिटिव्ह आला. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातच ऍडमिट करावे लागले.

डॉ. आरती उदगीरकर. मूळ गाव लातूर. सध्या ते निवासी डॉक्‍टर म्हणून वायसीएम हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. अतिदक्षता विभाग व कोरोना वॉर्डमध्ये त्या ड्युटी बजावत आहेत. त्यांनी एमबीबीएस आणि पॅथॉलॉजीमध्ये एमडी केले आहे. नांदेड सिटी येथे त्यांचे भाऊ योगेश आणि व्यंकटेश उदगीर हे राहतात. दर सणाला सर्व जण एकत्र जमतात. एकूण पाच भावंडे आहेत. शुभांगी, धनश्री आणि आरती या तीन बहिणी. मात्र, पहिल्यांदाच भावाला राखी बांधता आली नाही. ही सल त्यांच्या मनात राहिली. लॉकडाउनपूर्वी सर्व कुटुंबीयांची भेट झाली होती. त्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी दोन्ही भावांनी सकाळी व्हिडिओ कॉल करून आरतीला धीर दिला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. आरती म्हणाल्या, "कर्तव्य बजावत असताना कधी ताप, खोकला आणि अचानक अंगदु:खी जाणवू लागली. समजलंच नाही. रुग्णालयात पीपीई कीट घालून दक्षताही घेतली. रुग्णांच्या तपासण्या करताना सतत संपर्क येत असतो. हवेद्वारे संसर्ग झाला असण्याची शक्‍यता आहे. 20 जुलैनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 14 दिवसांनी तपासणी केल्यानंतर 3 ऑगस्टलाही अहवाल पॉझिटिव्ह आला. आता घरचे काळजी करत आहेत. सध्या अशक्तपणा जाणवत आहे. कुटुंबीयांचे प्रेम कायम आपल्यासोबत असते. त्यामुळे पूर्णपणे बरी झाल्यानंतर राखी बांधेल. सध्या आद्यकर्तव्य बजावून कोरोना रुग्णांची सेवा केल्याचे समाधान आहे. लवकर बरी होऊन पुन्हा रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णालयात दाखल होईल."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com