
हिंजवडीतील आदर्श नगर काकडे कॉलनीत हा प्रकार घडला. गेल्या तीन दिवसांपासून श्वानाच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकली होती.
प्राणी मित्रांमुळे श्वानाला मिळाले जीवदान
वाकड - तीन दिवसांपासून कुत्र्याच्या (Dog) डोक्यामध्ये प्लास्टिकची बरणी (Plastic Jar) अडकली, स्वतःवर ताबा नसलेला तो मग कुठेही बेफान भटकू लागला. मी आता मानव निर्मीत जाळ्यात अडकलो असून जीवाला धोका (Life Danger) असल्याची खात्री झाल्याने स्वतःला वाचविण्यासाठी तो सैरभैर पळू लागला अन पळता पळता तो खोल विहिरीत पडला. मात्र, वाईल्ड अँनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी सदस्यांच्या तत्परतेमुळे अखेर त्याला जीवदान (Life Saving) मिळाले त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी हा प्रत्यय पुन्हा एकदा स्थानिकांना आला.
हिंजवडीतील आदर्श नगर काकडे कॉलनीत हा प्रकार घडला. गेल्या तीन दिवसांपासून श्वानाच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकली होती. त्याला वाचवण्यासाठी वाईल्ड अँनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीच्या सदस्यांनी खूप प्रयत्न केले परंतु काही केल्या कुत्रा सापडत नव्हता. तीन दिवस अन्न पाणी मिळाले नाही त्यामुळे कुत्रा पाण्याच्या शोधात विहिरीच्या कडेला आला विहीराला संरक्षक भिंत नसल्याने तो सुमारे ४० ते ५० फूट खोल विहिरीत पाण्यामध्ये पडला.
शेतातील कामगारांनी या घटनेची माहिती संस्थेच्या सदस्यांना दिल्याने लगेच त्या ठिकाणी वाईल्ड अँनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शनचे सदस्य गणेश भुतकर, श्रीकांत काकडे, किरण जांभुळकर, शेखर जांभूळकर तसेच तुषार पवार दाखल झाले. संरक्षक पट्ट्याच्या मदतीने विहीरीत उतरून हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. मोठ्या प्रयत्नांनी त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याच्या डोक्यातील बरणी कापून त्याला मुक्त करण्यात आले.
भटक्या कुत्र्यांना बरणीत ठेवलेल्या खाद्यपदार्थांचा
वास आल्यामुळे श्वान त्यात डोके घालतात पण ते डोके बाहेर काढायला असमर्थ ठरतात. परिणामी अन्नपाणी न मिळाल्याने त्यांचा काही दिवसांनी मृत्यू होतो. तरी नागरीकांनी मोकळ्या बरण्या कोठेही न टाकता त्या झाकण लावून कचरा कुंडीत अथवा घंटागाडीतच टाकाव्यात असे आवाहन संस्थेच्या सदस्यांनी केले आहे.
Web Title: Dogs Saved Life By Animal Friends In Wakad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..