Domestic LPG cylinder
sakal
पिंपरी - घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करण्यास मनाई आहे. तरीही, शहरातील खाऊगल्ल्यांमध्ये या सिलिंडरचा बिनधास्त वापर सुरू आहे. या सिलिंडरच्या काळ्याबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरवठा विभागाचे ‘भरारी पथक’ आणि ‘पुरवठा निरीक्षक’ नावालाच उरले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी जागे होऊन या ‘नावापुरत्या’ पथकाला सक्रिय करणार का? आणि गॅसचा काळाबाजार रोखणार का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.