घरेलू कामगारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले 'एवढे' पोस्टकार्ड; आठवडाभर चालणार ही मोहीम  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

- २५०० पोस्टकार्डाद्वारे सह्यांची मोहीम 

पिंपरी :  कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये घरेलू कामगारांच्या कामगारावर परिणाम झाला. अनेकांच्या हातचं काम गेलं, खायचं काय, जगायचं कसं, अशी परिस्थिती निर्माण झाली. या संकटातून बाहेर काढण्यासाठी महिला कामगारांना पंधरा हजारांचे आर्थिक साह्य मिळावे म्हणून कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे शहरातील घरेलू महिला कामगार यांच्याकडून पोस्टकार्ड सह्यांची मोहीम सुरू करण्यात आलीय. गुरुवारी (ता. 17) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २५०० पत्रे  आकुर्डी व पिंपरी येथील टपाल पेटीत टाकून पाठवण्यात आली. हा उपक्रम आठवडाभर चालणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी  कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, राणी माने, कमल तोरणे, विजया पाटील, मनीषा पवार, कविता म्हस्के, बशीरा शेख, शकिला शेख, अशा दुनधव, अंजना कांबळे, जयश्री वाळुंज, सुवर्णा शेलार, रत्ना पाटील, वंदना कारंडे आदीसह घरेलू कामगार उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाउनमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अनेकांच्या हाताला काम मिळावे. त्यांचा लॉकडाउनमधील पगार मिळावा, यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ प्रयत्नशील असून, अनेकाना लाभ व काम मिळालंय. त्यासाठी मोफत कोरोना टेस्ट करून कामास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपासून घरेलू कामगारांना घर मालकाने अजुनही कामावर घेतले जात नाही. ही परिस्थिती बिकट असून, जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही त्यांचे पालन होत नाही. त्यांना कामावर घेतले पाहिजे, राज्य सरकारकडून आर्थिक मदत व सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी पोस्टकार्डाद्वारे सह्या करून केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: domestic workers send 2500 postcards to CM from pimpri chinchwad