तळेगावातील जेष्ठ वैदयकीय तज्ञ डाॅ. दिलीप भोगे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

मायमर वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. तळेगाव जनरल हाॅस्पीटलच्या औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख तथा मावळातील जेष्ठ वैदयकीय तज्ञ प्रा. डॉ. दिलीप भोगे यांचे वयाच्या पासष्टाव्या वर्षी बुधवारी (ता. २३) पहाटे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. कोरोना संसर्गामुळे गेले जवळपास पंचवीस दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या मागे पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

तळेगाव स्टेशन - मायमर वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. तळेगाव जनरल हाॅस्पीटलच्या औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख तथा मावळातील जेष्ठ वैदयकीय तज्ञ प्रा. डॉ. दिलीप भोगे यांचे वयाच्या पासष्टाव्या वर्षी बुधवारी (ता. २३) पहाटे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. कोरोना संसर्गामुळे गेले जवळपास पंचवीस दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या मागे पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड कॉन्व्हलसंन्ट होम संस्थेचे मानद वैद्यकीय अधीक्षक, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या केंद्रीय कार्यकारीणीचे सदस्य आणि मावळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. मुळचे नंदुरबार जिल्ह्यातील शहादाचे असलेले डाॅ. भोगे यांनी पुण्यातील बी. जे. वैदयकीय महाविद्यालयात पदवी घेऊन चार दशकांहून अधिक काळ मावळात रुग्णसेवा केली. प्रताप मेमोरियल हाॅस्पीटलचे ते संस्थापक होते.  कोविड - 19 साथीच्या काळात मावळ तालुका स्तरावरील उपाय योजनांबरोबरच कोविड सेंटर निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन होते.वैद्यकीय शिक्षण आणि रुग्ण सेवेबरोबरच सामाजिक कार्यामध्येही त्यांचा सहभाग असे. अभ्यासू, मनमिळावू, विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आणि रुग्णांमध्ये अत्यंत आदर असलेले डॉ. भोगे यांच्या जाण्याने वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना तळेगावकरांनी व्यक्त केली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr dilip bhoge passed away