Dr. Vijay Suryavanshi: ठोकळवाडी, मुळशी धरणांतून पाणी आणणार: डॉ. विजय सूर्यवंशी यांची माहिती; महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली!

Water to be supplied from Thokvalwadi and Mulshi dams Pune: ठोकळवाडी, मुळशी धरणांतून पाणी आणण्याचा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
Water Connectivity Project from Thokvalwadi and Mulshi Dams Announced as Dr. Vijay Suryavanshi Becomes PMC Chief

Water Connectivity Project from Thokvalwadi and Mulshi Dams Announced as Dr. Vijay Suryavanshi Becomes PMC Chief

sakal

Updated on

पिंपरी: ‘‘शहरातील लोकसंख्यावाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षांचा विचार करून पाण्याचे स्रोत वाढविण्यावर भर देणार आहे. ठोकळवाडी, मुळशी धरणांतून पाणी आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल,’’असे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Water Connectivity Project from Thokvalwadi and Mulshi Dams Announced as Dr. Vijay Suryavanshi Becomes PMC Chief
राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

डॉ. सूर्यवंशी यांनी सोमवारी (ता. १६) प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. महापौर रवी लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आदींनी त्यांचे स्वागत केले. नागरी सुविधा, प्रकल्पांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिक्षण, क्रीडा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आदी कामांवर भर देणार असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com