
Pimpri Chinchwad Traffic
esakal
अिवनाश ढगे
पिंपरी : निगडीतील टिळक चौकात काही दिवसांपूर्वी खासगी कंपनीची बस आणि पीएमपी बसचा अपघात झाला होता. दोन्ही बसचे चालक जखमी झाले होते. तसेच, जुलै महिन्यात देहू फाटा ते सुधा पूल यादरम्यान एसटी बसला खासगी बसने मागून धडक दिल्याने दहा कामगार जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर भोसरी, मोशी, चिखली, निगडी, तळवडे, भुमकर चौक, डांगे चौक या ‘पिकअप पॉइंट’वर प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.