
चिंचवड : आकुर्डी येथून चिंचवडकडे येणाऱ्या रिक्षाने एसटी बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातानंतर मद्यधुंद रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराने रस्त्यातच गोंधळ घातल्याने ग्रेड सेपरेटरमध्ये सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी रिक्षाचालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. हा अपघात सोमवारी (ता. २३) दुपारी झाला.