
Dussehra Shopping
Sakal
पिंपरी : विजयादशमी म्हणजे दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक. असत्यावरील सत्याच्या विजयाचा उत्सव. आपुलकीने सोनं लुटायचा आणि आनंदाचं तोरणं दारी बांधायचा. त्याच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी (ता.१) बाजारपेठांमध्ये नवचैतन्य पसरले. इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सोने, वाहन खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह दिसून आला.