esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीएमपी’मध्ये आता ई-कॅबही!

‘पीएमपी’मध्ये आता ई-कॅबही!

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठराविक अंतरासाठी प्रवाशांना इलेक्ट्रिक मोटारद्वारे (ई-कॅब) सेवा देण्याचे नियोजन पीएमपीने केले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १०० ते २०० मोटारी पीएमपीच्या ताफ्यात दाखल होऊ शकतात. कंपन्यांच्या कॅब आणि रिक्षाच्या तुलनेत ही सेवा स्वस्त असेल, असा पीएमपीचा दावा आहे. परिवहन सेवेच्या माध्यमातून ई-कॅबद्वारे प्रवाशांना सेवा देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

हेही वाचा: स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकऱ्यासाठी प्रयत्न करणार : उदय सामंत

विमानतळ, एसटी, रेल्वे

स्थानक तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी या कॅब प्रवाशांना उपलब्ध असतील. तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त असेल, असा पीएमपीचा होरा आहे. पुणे दर्शन किंवा पिंपरी चिंचवड दर्शनही पीएमपीच्या या ई-कॅबच्या माध्यमातून प्रवाशांना उपलब्ध होऊ शकते. पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रस्तावाची प्रत ‘सकाळ’ला उपलब्ध झाली आहे.

पीएमपीच्या ताफ्यातील बस

एकूण बस २२६१

रस्त्यावर धावणाऱ्या बस १४००

सीएनजीवरील मिडी बस २८८

ई-बस १२५

ई मिडी बस २५

६ लाख

पीएमपीचे रोजचे सरासरी प्रवासी

११ लाख

कोरोनापूर्व काळातील रोजची प्रवासी संख्या

९८ लाख

पीएमपीचे रोजचे सरासरी उत्पन्न

१.५ कोटी

कोरोनापूर्व काळातील रोजचे उत्पन्न

"सार्वजनिक वाहतुकीद्वारे जास्तीत जास्त प्रवाशांची वाहतूक करण्याचे धोरण आहे. पीएमपीने बसची संख्या वाढवून प्रवासी वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे."- महेश झगडे, माजी महापालिका आयुक्त

पीएमपीची ई-कॅब सेवा सुरू झाल्यास त्याचा प्रवाशांना फायदा होणार का, याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह व्हॉट्सअॅपवर कळवा...

८४८४९७३६०२

loading image
go to top