स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकऱ्यासाठी प्रयत्न करणार : उदय सामंत

कोरोना काळात शिक्षण प्रक्रिया थांबून न देता, मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन शिक्षणाची प्रभावी अमंलबजावणी झाली.
samant
samantsakal
Updated on

शिरवळ (सातारा) : कोरोना काळात शिक्षण प्रक्रिया थांबून न देता, मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन शिक्षणाची प्रभावी अमंलबजावणी झाली. नायगावकरांच्या मागणीप्रमाणे लवकरच उध्दव ठाकरे यांना नायगावला आणणार असुन, भुमिपुत्रांना स्थानिक कंपन्यात नोकऱ्या मिळाव्यात यासाठी पुढील दोन महिन्यात मंत्रालयात बैठक आयोजित करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगांव येथे सोमवारी (ता.4 ) शिवसेनाचा भव्य संवाद मेळाव्यात बोलत होते.

samant
शेतकऱ्यांनी दिलेले सोयाबीन मुख्यमंत्र्यांना देणार भेट : फडणवीस

यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील,जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख अजित यादव,शिवसेना जिल्हा महिला संघटक शारदा जाधव,हाय-टेक कंपनीचे मॅनेजर दर्शन मोडकर ,प्रदिप माने,वाई विधानसभा संपर्कप्रमुख शिवाजी कदम,शिवसेना तालुकाप्रमुख आदेश जमदाडे,प्राचार्य कोकरे व कार्यकर्ते हे उपस्थित होते. राज्यात आभियांञिकी महाविद्यालयाचे जाळे सध्या राज्यभर आहे.माञ येथील 75 टक्के जनता कृषीवर अवलंबून असताना केवळ चार, कृषी विद्यापीठाद्वारे कृषी शिक्षण दिले जात असल्याची खंत व्यक्त करुन,राज्यात कृषी महाविद्यालयाचीही याचप्रमाणे निर्मिती करावी अशी,अपेक्षा व्यक्त केली.

samant
ब्लॉसम पब्लिक स्कूल आणि सिग्नेट स्कूल उत्साहात सुरू

कार्यक्रम प्रसंगी हाय-टेक या कंपनीतर्फे प्राथमिक शाळेत 48 विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. तर,तालुकाप्रमुख जमदाडे यांनी स्थानिकांना कंपन्यात नोकऱ्या मिळावे तसेच परिसरातील गावात 21 कोटींच्या विकासकामांची मागणी मागणी केली. दरम्यान मंत्री उदय सामंत, उपनेते नितीन बानगुडे- पाटील व इतर मान्यवरांनी सावित्रीबाई फुले स्मारकास भेट देऊन,अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्तविकात सरपंच पूनम नेवसे यांनी विकासकामाची मागणी केली. तर शेवटी सुधीर नेवसे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmer Loss Assessment
Eknath Shinde Announces Crop Damage Panchanamas From October 5
Kas Plateau Flowers 2026
Clash Between Ruling and Opposition Factions at Sahyadri Sugar Factory AGM
Marathi News Esakal
www.esakal.com