Pune Mumbai Expressway Traffic Jam : वाहतूक, उद्योग क्षेत्राचे नुकसान; दैनंदिन पुरवठ्यासाठी नेल्या जाणाऱ्या बऱ्याच मालाची नासाडी

पुरवठा क्षमता असूनही कोंडीमुळे उद्योजकांना उत्पादन व वितरण प्रक्रिया थांबवावी लागली.
Pune Mumbai Expressway Traffic Jam

Pune Mumbai Expressway Traffic Jam

sakal

Updated on

- अमोल शित्रे

पिंपरी - वाहतूक आणि उद्योग क्षेत्राला कोंडीचा मोठा फटका बसला. वाहने कोंडीत अडकल्यामुळे दैनंदिन पुरवठ्यासाठी नेल्या जाणाऱ्या बऱ्याच मालाची नासाडी झाली. औद्योगिक क्षेत्रातील कच्चा माल, तयार उत्पादने घेऊन जाणारे मालवाहू ट्रक, मल्टी-अ‍ॅक्सल ट्रक, कंटेनर ट्रेलर, फ्लॅटबेड व बॉक्स ट्रक, टँकर यांच्यासह भाजीपाला, फळे, धान्य, साखर, कांदा, बटाटा यांसारखा शेतमाल वाहून नेणारे ट्रक व पिकअप वाहने, तसेच लॉजिस्टिक्स व कुरिअर कंपन्यांची वाहने अडकली. त्यामुळे उद्योजक, वाहनमालक, ट्रान्स्पोर्ट कंपनी मालक, शेतकरी, कंपनीचालक, कारखानदार यांच्यावर आर्थिक संकट कोसळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com