
पिंपरी : शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेल्या शालेय व्यवस्थापन समित्या महत्त्वाचा दुवा असतो. परंतु या समित्या केवळ नावापुरत्याच कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. शाळांतील मूलभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे कल्याणासाठी जबाबदार असलेल्या समित्या प्रत्यक्षात निष्क्रिय असून त्या केवळ कागदोपत्री अस्तित्वात आहेत.