देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डात वाहन प्रवेश शुल्क वसुली मोहीम सुरु; उत्पन्न वाढीसाठी लढवली शक्कल;

​मुकुंद परंडवाल
Thursday, 17 December 2020

अद्याप जीएसटीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे बोर्डाचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरले आहेत. याचाच एकभाग म्हणून देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विविध रस्त्यावरील वाहनांकडून वाहन प्रवेश शुल्क वसुलीसाठी हे अधिकारी वाहनांवर कारवाई करत आहेत.

देहू (पिंपरी): देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी देहूरोड कॅटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने वाहन प्रवेश शुल्क वसुली मोहीम सुरु केली आहे. तसेच वाहन प्रवेशकर न भरलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरु केले आहे. गेले चार दिवसापासून ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यत 47 हजारांची वसुली करण्यात आली आहे. जकात वसुली रद्द झाल्याने बोर्डाची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अद्याप जीएसटीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे बोर्डाचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरले आहेत. याचाच एकभाग म्हणून देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विविध रस्त्यावरील वाहनांकडून वाहन प्रवेश शुल्क वसुलीसाठी हे अधिकारी वाहनांवर कारवाई करत आहेत. देहूरोड ते देहू या रस्त्यावर तळवडे, चाकण, महाळुंगे एमआयडीसीकडे हजारो वाहने दररोज जा ये करतात. यातील अनेक वाहन चालकांनी आणि कंपनी प्रशासनाने मासिक पास सुविधा घेतलेली आहे. मात्र, अनेक वाहन चालक बोर्डाच्या नाक्यावर वाहन प्रवेश शुल्क न भरता जातात.तसेच मासिक पासची मुदतही संपलेली आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाने चार दिवसापासून वाहन तपासणी सुरु केली आहे. यात अनेक वाहनांवर कारवाई केली आहे.

अवयवदानाची चळवळ "अनलॉक'च रुग्णांचे प्राण वाचविण्याबाबत वाढतेय जागृती 
 

याबाबत बोर्डाच्या राजस्व विभागाचे अधिकारी नंदकुमार कंरजावणे यांनी सांगितले, प्रवाशी वाहतूक बससाठी वाहन प्रवेश शुल्क 70 रुपये आहे.तर मोठ्या अवजड वाहनांसाठी 100 रुपये शुल्क असून लहान वाहनांसाठी 40 रुपये आहे.यातील अनेकजण शुल्क न भरता प्रवेश करतात. यावर बोर्डाने कारवाई सुरु केली आहे.आतापर्यत 50 हजार रुपये दंड वसूल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efforts to increase the income of Dehuroad Cantonment Board