आकुर्डीत दुकानाचे शटर उचकटून आठ लाखांची चांदी लंपास 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

दुकानाचे शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने आठ लाख रूपये किमतीचे चांदीचे दागिने चोरीला गेले.

पिंपरी : दुकानाचे शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने आठ लाख रूपये किमतीचे चांदीचे दागिने चोरीला गेले. ही घटना आकुर्डी येथे घडली. 

सुरेंद्र फुरटमल पुनमिया (रा. मोरया पद्मापूर सोसायटी, विठ्ठल मंदिरासमोर, विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचे आकुर्डीतील विठ्ठलवाडी रोड येथे सोने-चांदीचे दुकान आहे. शनिवारी (ता.19) सायंकाळी सात ते रविवारी पहाटे सहा या कालावधीत अज्ञात चोरटा दुकानाचे शटर उचकटून आत शिरला. काउंटरच्या सात ड्रॉवरमधून आठ लाख रूपये किमतीची वीस किलो चांदी लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची तपासणी करण्यासह नागरिकांकडूनही माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eight lakh silver stolen by lifting shutters of shop at akurdi