पवनमावळ वासियांनो आता तरी सावध व्हा! एकट्या पवनमावळात...

co.jpg
co.jpg
Updated on

पवनानगर  : पुणे मुंबईकर गावी आल्यावर ओरड करणार्‍या मावळ वासियांनो स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या एकट्या पवनमावळात कोरोनाची लागन झालेले ८ रूग्ण सापडले आहेत.

या सातही रूग्णांना शहरातून गावाकडे आल्याची कोणतीच पार्श्वभूमी नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली हे सगळेजण शहारातील बाजारपेठेत फिरून आल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने लॉकडाऊन फक्त संचारबंदी यासारखी कायद्याची चौकट उभी केली असतानही अनेकांनी या चौकटीला पायंदळी घालून ही मंडळी वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडले होते.

लोकप्रतिनिधी अधिकारी पोलिस प्रशासन अरोग्य कर्मचारी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची जाणीव करून देत राहीले तरिही नागरिक दूर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले. मावळाच्या गावागावात कोरोना पोहचला असून, त्याला वेळेवर रोखण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे.

सद्यस्थिती पाहता चांदखेड येथे ५ रुग्ण, परंदवडी १ रुग्ण व कडधे २ रूग्ण आहेत. यामध्ये चांदखेड,परंदवडी व पवनानगर ह्या परिसरातील गावांसाठी मुख्य बाजारपेठ असून या परिसरातील अनेक नागरिकांचा या बाजारपेठेत मोठा संपर्क असतो. तसेच मोठ्या प्रमाणावर या बाजारपेठेत वर्दळ नागरिक करत असतात त्यात ग्रामीण भाग असल्याने सामाजिक अंतर, मास्क व सॅनेटाईझर याबाबत नागरिकांचे अज्ञान दिसते.

प्रतिबंधित गावाच्या वेशीवर जाणाऱ्या येणाऱ्यांची माहिती घेण्यासाठी चोवीस तास ड्युटीवर पोलिस  रात्रंदिवस तैनात केले आहेत. त्यांच्यासोबत शिक्षक,अरोग्यसेविका आशा वर्कर, अगंण़वाडी सेविका जाणाऱ्या येणाऱ्यांची नोंद ठेवीत आहे.  पण या गावातून कामशेत,सोमाटणे तळेगाव मार्गे जाणाऱ्यांची नोंद ठेवता येत नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com