पिंपरी महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election news Pimpri Municipal Corporation Election Final Ward Structure Announced
पिंपरी महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पिंपरी महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पिंपरी : महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यास राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (ता. १२) मंजुरी दिली असून अंतिम आराखडाही जाहीर झाला आहे. एकूण ५ हजार ६८४ हरकती व सूचना असतानाही मोजके बदल करण्यात आले आहेत. या बदलांसह अंतिम आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. चऱ्होली, चिखली, इंद्रायणीनगर, प्रेमलोकपार्क या प्रभागात किरकोळ फेरबदल करण्यात आले आहेत. यामुळे इच्छुकांना नेमक्‍या कोणत्या परिसरात निवडणूक लढवायची आहे, हे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारीला प्रसिद्ध केला होता. त्यात तीन सदस्यांचे ४५ व चार सदस्यांचा एक असे एकूण ४६ प्रभाग आहेत. एकूण १३९ नगरसेवकांची संख्या असणार आहे. त्या आराखड्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या. ५ हजार ६८४ हरकती व सूचनांवर २५ फेब्रुवारीला प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांचा अहवाल २ मार्चला राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला. मात्र, दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने राज्य सरकारने विधीमंडळात कायदा पारित करून प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेतले. मात्र, या कायद्याच्या विरोधात १३ जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकांवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी प्रभागरचनेच्या अंतिम आराखडा निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांच्यासमोर गुरुवारी सादर केला. त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली असून, त्यास गुरुवारी मंजुरी दिली आहे.

मात्र, दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने राज्य सरकारने विधीमंडळात कायदा पारित करून प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेतले होते. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी प्रभागरचनेच्या अंतिम आराखडा निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांच्यासमोर गुरुवारी सादर केला. त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली असून, त्यास गुरुवारी मंजुरी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी मिळताच महापालिकेच्या निवडणूक विभागाने हा अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे. प्रारूप आराखड्यामध्ये प्रभाग क्रमांक २, ३, ५, ७, ११, १२, २६ आणि २७ मध्ये बदल करण्यात आले आहेत. बदलानुसार काही भाग जोडून शेजारच्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रभागांच्या लोकसंख्येत बदल झाला आहे. हे किरकोळ बदल वगळता इतर कोणत्याही प्रभागात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

अंतिम आराखड्यामुळे भाजपची आशा फोल

प्रारूप आराखडा हा राष्ट्रवादीसाठी तारक ठरणार असल्याच्या शक्‍यता सुरवातीपासूनच वर्तविल्या जात आहेत. मात्र हजारोंच्या संख्येने हरकती व सूचना आल्यामुळे त्यामध्ये मोठा बदल होईल, अशी आशा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना होती. ही अपेक्षा आजच्या अंतिम आराखड्यामुळे फोल ठरली आहे. भाजपने घेतलेल्या आक्षेपांना निवडणूक आयोगाकडून कात्रजचा घाट दाखविण्यात आल्याचेच आज प्रसिद्ध झालेल्या आराखड्यावरून तरी स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने आज अंतिम आराखडा जाहीर करतानाच आरक्षणाबाबतही निर्णय घेण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात आरक्षणाचाही निर्णय अंतिम होण्याची शक्यता असून आरक्षणाचा कार्यक्रम निवडणूक आयोग लवकरच घोषित करण्याची शक्यता आहे. तसेच आजच्या आदेशामध्येच ईव्हीएम मशिनही दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्याबाबत सूचविण्यात आले आहे.

महापालिका प्रभाग रचना प्रारूप आराखडा मंजुर

आठ प्रभागांमध्ये किरकोळ बदल

अंतिम आराखडा असा

क्रमांक प्रभागाचे नाव लोकसंख्या आधीची लोकसंख्या नवी

प्रभाग २ ः चिखली गावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी ः ३३ हजार ६५३ ३२ हजार १६१

प्रभाग ३ ः बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी ः ३७ हजार ६७१ ३६ हजार ७१८

प्रभाग ५ ः चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी ः ३९ हजार ९७० ३४ हजार ८१६

प्रभाग ७ ः सँण्डविक कॉलनी, रामनगर ः ३७ हजार ९७ ४२ हजार २५१

प्रभाग ११ ः गवळीमाथा, बालाजीनगर, इंद्रायणीनगर ः ३७ हजार ३६० ३८ हजार ३१३

प्रभाग १२ ः घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती ः ३४ हजार ४१८ ३५ हजार ९१०

प्रभाग २६ ः बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर ः ३७ हजार ४२० ३९ हजार ६००

प्रभाग २७ ः चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह ः ३८ हजार ७२७ ३६ हजार ५४७

Web Title: Election News Pimpri Municipal Corporation Election Final Ward Structure Announced

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top