Teachers in Election Work
sakal
पिंपरी - निवडणूक कामावर हजर राहण्याचे आदेश मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी शिक्षकांना दिले आहेत. वर्ग सुटल्यानंतर आणि सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा ही कामे करण्याचे निर्देश आहेत. काही शाळांतील सर्व शिक्षकांना शाळांवर न जाता निवडणूक कामावर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे शाळेत शिकवायचे कधी? की ही कामे करायची? असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत.