
Underground Wiring Work Incomplete in Dighi Gaothan Even After 7 Years"
Sakal
भोसरी : दिघी गावठाण आणि परिसरातील काही भागांत विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम सात वर्षांनंतरही अपूर्णावस्थेतच आहे. त्यामुळे विद्युत खांबांवर तारांचे जाळे तयार झाले आहे. जोराचा वारा आल्यावर तेथे ठिणग्या उडून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. काही भागांत विद्युत तारांचे जाळे इमारतीतील गॅलरीला खेटून गेल्याने विजेचा धक्का बसून अपघात होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.