
रावेत परिसरामध्ये भालचंद्र पुरम इमारतीपासून ते सिटी प्राईड शाळेपर्यंतच्या भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे.
रावेत येथे गेल्या 3 दिवसांपासून वीजपुरवठा खंडित !
आकुर्डी - रावेत परिसरामध्ये भालचंद्र पुरम इमारतीपासून ते सिटी प्राईड शाळेपर्यंतच्या भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. कित्येकदा त्या भागामध्ये वीजपुरवठा खंडित होतो . रावेत सारख्या भागामध्ये तीन दिवस वीज पुरवठा खंडित होऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्या पाठीमागे काय कारण आहे हे समजावून घेऊन त्यावर उपाययोजना करणे किंवा त्याची दखल घेणे गरजेचे आहे असे नागरिकांनी सांगितले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने त्या भागात राहणाऱ्या नागरिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. इमारतींमध्ये राहणारे कित्येक जण अजूनही वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामावर याचा परिणाम होऊ लागला आहे. सध्या महावितरण अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार देण्यात आली असून त्यावर लवकरात लवकर उपाय योजना करण्यात यावी.
सध्या रावेत परिसरामध्ये रस्ता दुरुस्तीची व खोदकामाची कामे चालू आहे . त्यामुळे अशा पद्धतीचा वीज पुरवठा खंडित होत आहे असे वक्तव्य महावितरण अधिकारी तळपे यांनी नागरिकांकडे केले.
विशाल पाटील (नागरिक) -
सलग तीन दिवसांपासून आमच्या परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित होत आहे. अद्यापही त्यावर कोणत्याही पद्धतीची दखल घेतली गेली नाही.लवकरात लवकर दखल घेऊन वीज पुरवठा का खंडित झाला आहे ते शोधून काढून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Web Title: Electric Supply Close In Ravet For Last 3 Days
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..