पिंपरी-चिंचवड : सुटीच्या दिवशीच विजेचा खेळखंडोबा, नागरिक वैतागले  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक दिवसांपासून कासारवाडी, चिंचवडगाव, पिंपरीगाव, आकुर्डी, निगडी, भोसरी, वाकड, बिजलीनगर आदी परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे.

पिंपरी : "काळेवाडी व रहाटणी परिसरात विजेचा लपंडाव सुरू असतो. गेल्या काही दिवसांपासून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसात एकापेक्षा जास्त वेळा वीज गायब होते. रविवारी (ता. 11) सहावेळा वीज गेली. रात्री, मध्यरात्री व पहाटे कधीही वीज जात असते,'' अशी तक्रार काळेवाडीतील रहिवासी मयुरेश कुटे यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक दिवसांपासून कासारवाडी, चिंचवडगाव, पिंपरीगाव, आकुर्डी, निगडी, भोसरी, वाकड, बिजलीनगर आदी परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. चिंचवडगावात रविवारी तासभर वीज गायब झाली होती. दिवसातून अनेकदा वीज जात असल्याची तक्रार रहिवासी चिंतामणी कुलकर्णी यांनी केली. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मोरवाडीतील श्रद्धा हेरिटेज या परिसरात रविवारी सकाळी नऊ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. तीन तासानंतर वीज आली. तोपर्यंत नागरिकांची सकाळची कामे खोळंबली. अनेक इमारतीमध्ये वीज नसल्याने पाणीच आले नाही. परिणामी महिला वैतागल्या होत्या. तीच परिस्थिती अजमेरा कॉलनीतील वास्तू उद्योग परिसराची होती. वाकड-विशाल नगरमध्येही विजेचा लपंडाव सुरू असल्याने "वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांना अडचणी आल्याचे गोविंद गायकवाड यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात मध्यरात्री पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी केबल नादुरुस्त झाल्या असून, काही तुटल्या आहेत. त्यांच्या जोडणीचे काम सुरू आहे. त्यामुळे वीजपुरवठा अखंडितपणे सुरू राहत नाही. 
- शिवाजी वायफळकर, कार्यकारी अभियंता, महावितरण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity disconnect in pimpri chinchwad city