काय सांगता ! अडीचशे कामगारांच्या धन्याने स्वीकारली वॉर्डबॉयची नोकरी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

कोरोना संसर्ग झाल्याने खूप घाबरलो होतो. न्यूमोनियाचे प्रमाणही जास्त होते. श्‍वास घ्यायला त्रास व्हायचा. डॉक्‍टरांनी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. आता काही खरे नाही, असे वाटले. पण, मृत्यूशी झुंज देऊन बरा झालो. त्याच वेळी ठरवले कोरोनाबाधितांची सेवा करायची. त्यांच्या मनातील भीती घालवायची. जनजागृती करायची. म्हणून महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून सेवा करतोय.

भोसरी (पुणे) : ""कोरोना संसर्ग झाल्याने खूप घाबरलो होतो. न्यूमोनियाचे प्रमाणही जास्त होते. श्‍वास घ्यायला त्रास व्हायचा. डॉक्‍टरांनी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. आता काही खरे नाही, असे वाटले. पण, मृत्यूशी झुंज देऊन बरा झालो. त्याच वेळी ठरवले कोरोनाबाधितांची सेवा करायची. त्यांच्या मनातील भीती घालवायची. जनजागृती करायची. म्हणून महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून सेवा करतोय. महिना झालाय. मानधन मिळाले. त्यातील काही रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी व काही रक्कम सामाजिक संस्थेला देणार आहे,'' ही भावना आहे अडीचशे कामगारांना रोजगार देणारे तरुण व्यावसायिक सुभाष गायकवाड यांची. 

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

ट्रॅव्हल एजन्सी आणि सिक्‍युरिटी एजन्सी चालविणारा हा तरुण. स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीतून रुग्णालयात येतो. इतर कर्मचाऱ्यांसोबत साफसफाई करतो. त्यानंतर केस पेपर देण्याचे काम करतो. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांच्या मनातील भीती घालविण्याचेही काम करतोय. गायकवाड यांना जूनमध्ये संसर्ग झाला होता. त्यांच्याकडे दोन स्कॉर्पिओ आणि एक टाटा एस (छोटा हत्ती) अशी वाहने आहेत. भागीदारीमध्ये सिक्‍युरिटी एजन्सीही आहे. त्यांच्याकडे अडीचशे कामगार आहेत. मात्र, रुग्णसेवेसाठी त्यांनी महापालिकेची जाहिरात वाचून रीतसर अर्ज केला आणि वॉर्डबॉयची नोकरी स्वीकारली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेष म्हणजे त्यांची पत्नी सविता याही भोसरीतील रुग्णालयातच सहा महिन्यांपासून परिचारिकेचे काम करीत आहेत. रुग्णांची ऍन्टीजन टेस्टसह इतर कामे त्यात करीत आहेत. स्कॉर्पिओतून आलेला माणूस साफसफाई करताना पाहून अन्य कर्मचारी व रुग्णांनाही आश्‍चर्य वाटते. त्यांचा पहिला पगार बुधवारी (ता. 16) झाला. त्याची रक्कम दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच, यापुढील पगारही विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

सुभाष गायकवाड यांचे रुग्णालयातील काम चांगले आहे. कोरोना संसर्ग झाला तेव्हा त्यांना श्‍वसनाचा अधिक त्रास होत होता. पण, आमच्याकडे बेड उपलब्ध नसल्याने त्यांना वायसीएममध्ये दाखल केले. या संसर्गातून बरे झाल्यावर त्यांनी कोरोना रुग्णांची सेवा करण्याचा निर्धार केला होता. 
- डॉ. शैलजा भावसार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, भोसरी रुग्णालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The employer of two hundred and fifty workers accepted the job of a wardboy