रोजगार गेला आता उदरनिर्वाहाचा प्रश्न; सरकारकडून कारवाई चालू असल्याचे उत्तर

वृत्तसंस्था
रविवार, 21 जून 2020

लॉकडाउनपूर्वी पगारवाढ आणि बढती  दिलेल्या कायम कामगारांना कामावरून कमी करू लागल्याच्या घटना घडत आहेत. सहा ते सात कंपन्यांमधील जवळपास शंभर कामगारांना रोजगार गमवावा लागला असल्याचे चित्र सध्या पिंपरी औद्योगिक वसाहतीत दिसून येत आहे.

पिंपरी : लॉकडाउनपूर्वी पगारवाढ आणि बढती  दिलेल्या कायम कामगारांना कामावरून कमी करू लागल्याच्या घटना घडत आहेत. सहा ते सात कंपन्यांमधील जवळपास शंभर कामगारांना रोजगार गमवावा लागला असल्याचे चित्र सध्या पिंपरी औद्योगिक वसाहतीत दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कामगार कामगारांच्या युनियन फोडण्यासाठी काही कंपन्यांनी युनियनमधील सभासदांना युनियनच्या सभासदत्वाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्याबदल्यात पगारवाढ सुपरवायजरचे पद देऊ केले आहे. काही कामगारांनी ही ऑफर स्वीकारली असून सरकारने उद्योगांना परवानगी दिल्यानंतर दुसर्‍या जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी गेलेले कामगार परत आले आहेत. घरी आल्यानंतर या सर्वांना नियमानुसार 14 दिवस होम क्वारंटाईन रहावे लागले. त्यानंतर कंपनीत कामावर गेल्यावर काही कंपन्यांनी अशा कामगारांना विविध कारणे सांगत कामावरून कमी केलेन आहे. त्यामुळे अशा कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ या कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर ढोकले यांनी सांगितले आहे.

कायम कामगारांचे प्रमाण हळूहळू कमी करण्याकडे कंपन्यांचा कल आहे. अशा कामगारांचे वेतनही जास्त असते. ज्या कामगारांनी वय जास्त आहे, अशा कामगारांना कंपन्या कामावरून कमी करण्यास प्राधान्य देत आहेत. काही ठिकाणी वेतनही देण्यात येत नाही. तसेच, काही कंपन्यांनी कामगारांच्या वेतनात 25 ते 50 टक्के कपात केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवली आहेत. त्यांच्याकडून याची तातडीने दखल घेण्यात येत आहे. पत्र पाठवल्यानंतर केवळ एका तासामध्ये तुमच्या पत्राची आम्ही दखल घेतली आहे. पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पत्र पाठविण्यात येत आहे अशा आशयाचा मजकूर  मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रांमध्ये असतो. संबंधित विभागांकडे पत्राचा पाठपुरावा केल्यावर आम्ही प्रकरण पाहत आहे असे उत्तर  मिळते, असेही किशोर ढोकले यांनी यावेळी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment is gone now the question of subsistence In Pimpri