

Rickshaw drivers and hawkers occupy Pimpri PMP bus stands
esakal
अविनाश ढगे
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अनेक बसथांबे अनधिकृत फेरीवाले आणि रिक्षाचालकांनी वेढले आहेत. ‘प्रवाशांचा व्हावा खोळंबा, हा तर आपलाच थांबा’ हेच त्यांचे घोषवाक्य असावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्यावर वाहतूक पोलिस, महापालिका प्रशासनाचा अतिक्रमण विरोधी विभाग केव्हा कारवाई करणार, असा कूटप्रश्न प्रवाशांना पडला आहे.