आई वडिलांची काळजी घे, अशी भावाला विनंती करत अभियंत्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amey Chavan

लहान भावाला विनंती करणाऱ्या आशयाची सुसाईड नोट लिहून अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून अभियंत्या तरुणाने संपवली जीवनयात्रा.

आई वडिलांची काळजी घे, अशी भावाला विनंती करत अभियंत्याची आत्महत्या

वाकड - कोणावरही माझा राग नाही, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, दोष देऊ नये तसेच आई वडिलांचा सांभाळ कर अशी लहान भावाला विनंती करणाऱ्या आशयाची सुसाईड नोट लिहून अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून अभियंत्या तरुणाने जीवन यात्रा संपवली. ही घटना बुधवारी (ता. २६) रात्री आठच्या सुमारास वाकड येथील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये घडली.

अमेय शिवाजी चव्हाण (वय. २९, रा. वैष्णवी अपार्टमेंट, वाकड, मूळ गाव. लातूर) असे आत्महत्या केलेल्या अभियंता तरुणाचे नाव आहे. तो गेल्या एक वर्षांपासून वाकडला पीजी हॉस्टेलमध्ये राहत होता.

बुधवारी इतर सर्व मित्र बाहेर गेल्याने अमेय रूममध्ये एकटाच होता तेंव्हा त्याने सुरुवातीला दोरीच्या साहाय्याने फॅनला फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता त्यात तो अपयशी झाला. नंतर त्याने इमारतीच्या टेरेस वरून उडी मारत स्वतःला संपविले. अमेय हा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचा. अलिकडे त्याला सोरायसिसचा त्रास सुरू झाला होता या आजार पणाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वाकड पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास फौजदार अतुल जाधव करीत आहेत.

टॅग्स :Youthwakad